नवी मुंबई : निष्णात कार डिझायनर्सच्या तोडीची एक कार खारघरच्या एका तरुणाने तयार केली आहे. विशेष म्हणजे ऑटोमोबाईलचं कोणतंही शिक्षण नसताना रिक्षाचालकाच्या मुलाने ही भन्नाट कार बनवली आहे.


यूट्युबवरचे व्हिडिओ बघता बघता प्रेम ठाकूरने त्याची ड्रीम कार साकारली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या पठ्ठ्याने ही सुसाट कार बनवली आहे. मुंबई, कुर्ला, शिळफाटा या भागातून प्रेमने काही भंगारातलं सामान खरेदी केलं आणि चार महिन्यांच्या अथक मेहनतीतून कारचं स्वप्न सत्यात उतरवलं.

रिक्षाचालकाच्या मुलाला कार बनवणं म्हणजे पैशांची चणचण आलीच. पाच गियरच्या या कारचा स्पीड 100 च्या वर आहे. आणि सध्या ही कार 10 किमीपर्यंत धावते. त्यामुळे जवळच्या अंतरासाठी तिचा उत्तम उपयोग होत आहे. त्यामुळे केवळ पुस्तकी अभ्यास महत्वाचा की प्रॅक्टीकल शिक्षण याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा.