मुंबई : गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे Windows 10 अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर यूजर्सना विंडोजचे फ्री अपडेट मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण ज्यांनी विंडोज अपडेट केले नाही, त्या यूजर्सना कंपनीने एक संधी दिली आहे. मायक्रोसॉफ्टने Windows 7 आणि Windows 8.1 यूजर्ससाठी फ्री अपग्रेड ऑफर एक्सटेंशन देण्याची घोषणा केली आहे. सामान्य यूजर्ससाठी हे अपडेट बंद झाल्यानंतर, मायक्रोसॉफ्टने एक्सटेंशनसोबतच एक लूपहोल सुरु केले आहे. ज्याच्या सहाय्याने तुम्हाला Windows 10चे अपडेट मिळेल.


 

या अपडेटसाठी यूजर्सना मायक्रोसॉफ्टच्या hidden away accessibility site वर EXE फाईल डाऊनलोड कराव्या लागतील. यानंतर Windows 10 अपडेट होण्यास सुरुवात होईल. मायक्रोसॉफ्टकडून या एक्सटेंशनची कालमर्यादा काय असेल हे, अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र, कंपनीने हे अपडेट एक्सटेंशन बंद करण्यापूर्वी त्याची पूर्वकल्पना दिली जाईल, हे स्पष्ट केले आहे.

 

मायक्रोसॉफ्टने आपल्या वर्धापन दिनानिमित्त फ्री Windows 10चे अपडेट दिले होते. ज्यामध्ये कोर्टानाचेही अपडेट व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले होते.