नवी दिल्लीः मारुकी सुझुकी कंपनीने काही कारच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. यामध्ये गाड्यांच्या किंमती 1500 रुपयांपासून ते 5 हजारांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे मारुतीच्या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त कात्री लागणार आहे. ही दरवाढ 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे.
मारुतीच्या व्हिटारा ब्रेझा कारच्या किंमतीत 20 हजारांची वाढ करण्यात आली आहे. बलोनोच्या किंमतीत 10 हजारांची वाढ केली आहे. कंपनीने फॉरेक्स मूव्हमेंट आणि ग्राहकांची सेगमेंट वाईज मागणी हे महागाई वाढवण्यामागचं कारण सांगितलं आहे.
व्हिटारा ब्रेझा मार्च 2016 मध्ये एका ऑटो एक्स्पोमध्ये 6 लाख 99 हजार रुपये किंमतीसह लाँच केली होती. तर बलोनोची लाँचिंग प्राईस 4 लाख 99 हजार रुपये होती. मारुतीने या अगोदरही केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या 'इन्फ्रास्ट्रक्चर सेस'साठी गाड्यांच्या किंमतीत जवळपास 34 हजार 494 रुपयांपर्यंत वाढ केली होती.