मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच एक फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करु शकता. मात्र हे डिलीट केलेले मेसेजही पुन्हा वाचले जाऊ शकतात, असं समोर आलं आहे.


स्पेसनच्या अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेनुसार, व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कित्येक तासांनी पुन्हा वाचले जाऊ शकतात. मेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे तुम्ही मेसेज पुन्हा वाचू शकता, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

उदाहरणार्थ, व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज तुम्ही डिलीट केला. मात्र ज्याला मेसेज पाठवलाय त्याच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर नॉटिफिकेशन सेटिंगच्या माध्यमातून मेसेज पुन्हा वाचला जाऊ शकतो.

नॉटिफिकेशन हिस्ट्री नावाचं एक अॅप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून हिस्ट्री सेटिंग्समधून व्हॉट्सअॅप नॉटिफिकेशन रिकव्हर केले जाऊ शकतात, असं ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक अतिरिक्त ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. मात्र फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरं वाचता येऊ शकतील.

व्हॉट्सअॅपचं डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आलं आहे. मात्र हे नॉटिफिकेशन अॅप केवळ अँड्रॉईडवरच काम करतं. याबाबत व्हॉट्सअॅपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुढच्या अपडेटमध्ये फीचरमधील ही चूक दुरुस्त केली जाऊ शकते.