नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर तुम्ही दुसऱ्या कंपनीचा फोन पाहिला असेल. मात्र आता फ्लिपकार्ट ब्रँडचा नवा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या ब्रँड बिलियनचा पहिला स्मार्टफोन बिलियन कॅप्चर प्लसची विक्री सुरु झाली आहे. कंपनीने यासोबत लाँचिंग ऑफर्सही दिल्या आहेत.

ड्युअल रिअर कॅमेरा ही बिलियन कॅप्चर प्लसची विशेषता आहे. दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची किंमत 10 हजार 999 रुपये, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 12 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

लाँचिंग ऑफर्स काय आहेत?

  • एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारसांसाठी 10 टक्के कॅशबॅक

  • 12 हजार 999 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर

  • Lenovo K5 Note, Honor 6X आणि Redmi Note 3 हा फोन एक्स्चेंज केल्यास अतिरिक्त 1 हजार रुपये सूट

  • आयडियाचा 60GB डेटा

  • 249 रुपयांचा ओला शेअर पास


फ्लिपकार्ट बिलियन कॅप्चर प्लसचे फीचर्स

  • अँड्रॉईड 7.1.2 नॉगट

  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर

  • 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट

  • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट

  • 13 मेगापिक्सेल (आरजीबी) आणि 13 मेगापिक्सेल (मोनोक्रोम) सेंसर

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3500mAh क्षमतेची बॅटरी