आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नवे अॅप
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 10:42 AM (IST)
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी केंद्र सरकारच्यावतीने विविध शासकीय कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. योग दिनासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने नवीन अॅप नुकतेच लाँच केले. मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर हे अॅप लाँच करण्यात आले आहे. २१ जून रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा २१ जूनचा दुसरा योग दिन असल्यामुळे यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी होत आहे. यंदाच्या योग दिनाला सोशल मीडियाशी कनेक्ट करण्याच्या उद्देशाने हे नवे अॅप लाँच करण्यात आले आहे. या अॅपमध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अॅण्ड नॅचरोपॅथी (CCRYN)कडून तयार करण्यात आलेली नियमावली देण्यात आली आहे. तसेच ४५ मिनिटांचा योगा तुम्हाला कसा उत्तम आरोग्य देऊ शकतो याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जीमपेक्षा योगाचे महत्त्व या अॅपच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्व अॅन्ड्राईडधारकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाचं योगा अॅप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा