नवी दिल्ली : चीनी स्मार्ट फोनमेकर शाओमी (MI) फेब्रवारी महिन्यात एक धमाकेदार मोबाईल आणण्याच्या तयारीत आहे. हा भारतातला पहिला 5G फोन असण्याची शक्यता आहे. शाओमीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला याबद्दल माहिती पाठवली आहे. ज्याचं नाव एमआय मिक्स 3 असणार आहे. या मोबाइलमधील सर्वच फिचर खास असणार आहेत. ज्यात 10 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंतच स्टोरेज असू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.


मोबइल वर्ल्ड काँग्रेस MWC2019 ची सुरुवात पुढील महिन्यात होणार आहे. स्मार्टफोन मेकर्स सोनी, सॅमसंग आणि अन्य कंपन्यानी यासाठी MWC ला माहिती पाठवायला सुरु केली आहे. यातच शाओमी कंपनीने नवीन फास्ट फिचर असलेला एमआय मिक्स 3 मोबाइल लॉन्च करणार असल्याचं सांगितलं आहे. शाओमीने इवेंटची तारीख 24 फेब्रवारी ठेवली आहे. याच इव्हेंटमध्ये या फास्ट फिचर मोबइलचं लाँचिग होऊ शकतं.
एमआय मिक्स 3 मोबाइलमध्ये हे फिचर्स असतील ?

- क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन 845 / X50 प्रोसेसर
- 5G नेटवर्क
- 6.39' इंच फुल HD डिसप्ले
- 10 जीबी रॅम
- 256 जीबी स्टोरेज
- 12 मेगापिक्सल असणारे दोन कॅमेरे
- फ्रंट कॅमेरेही दोन असणार, ज्यात 24 आणि 2 मेगापिक्सल सेंसर असणार आहे.
- 4000mah ची पॉवरफूल बॅटरी
-या मोबाईलमध्ये अँडरॉईड 9.0 पाय असणार आहे.