मुंबई : 'विंडोज 7' चे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.
एका वर्षानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ विंडोज 7 चे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे संगणकाची सुरक्षा होत असते.
मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी जून महिन्यातच विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केला होता. सात जुलै 2009 रोजी मायक्रोसॉफ्टने Windows 7 सादर केलं होतं. विंडोज 7 नंतर Windows 8 , Windows 8.1 आलं. जुलै 2015 मध्ये Windows 10 लाँच करण्यात आलं. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्या यूझर्सची संख्या 70 कोटींहून जास्त आहे.
आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे. ही सुविधा सुरु ठेवायची असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील. इंटरप्राइजेस युजर्स अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत असल्यामुळे त्याचा वापर एकदम बंद करणं कठीण आहे. सामान्य ग्राहकांना हे अपडेट मिळणार नाहीत. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.
'विंडोज 7'चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2019 08:29 AM (IST)
14 जानेवारी 2020 पासून 'मायक्रोसॉफ्ट' विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ विंडोज 7 चे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -