नवी दिल्ली : शाओमीने व्हॅलेंटाईन डेचं खास गिफ्ट दिलं आहे. कंपनीने रेड मी नोट 5, रेड मी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन आणि Mi हा टीव्ही लाँच केला आहे. दोन्ही स्मार्टफोन आणि टीव्ही 22 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.




रेड मी नोट 5 चे स्पेसिफिकेशन

रेड मी नोट 5 हे गेल्या वर्षीच्या रेड मी नोट 5 चं नवं व्हर्जन आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम देण्यात आली आहे. या शिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होईल.

रेडमी नोट 5 प्रोची किंमत

रेड मी नोट 5 प्रोचा ग्लोबल लाँच आज दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. हा बजेट कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनचे 4GB रॅम आणि 6GB रॅम असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये, तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.



रेडमी नोट 5 प्रोचे स्पेसिफिकेशन

रेडमी नोट 5 प्रो या फोनमध्ये 5.9 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 12MP+5MP ड्युअल रिअर कॅमेरा, ब्यूटीफाय 4.0, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फ्रंट कॅमेऱ्यासाठी पोर्ट्रेट मोड, 64 GB इंटर्नल स्टोरेज आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.



Mi TV

शाओमीने भारतीय बाजारात पहिल्यांदाच स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. 22 फेब्रुवारीपासून हा टीव्ही ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येईल. या टीव्हीची किंमत 39 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 55 इंचच्या या टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 8GB इंटर्नल स्टोरेज आणि क्वाडकोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे.