मुंबई : आयफोन चाहत्यांसाठी अॅपलने एक खास ऑफर आणली आहे. फ्लिपकार्टने अॅपलच्या सर्व आयफोनवर बंपर डिस्काउंट दिलं आहे. या सेलमध्ये आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोन मोठी सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसोबतच आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसंच ईएमआय आणि कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. हा सेल 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.


iPhone 7 (32GB): आयफोन 7वर तब्बल 7000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यासोबतच यूजर्सला 18,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. अॅपलने हा आयफोन 2016 साली लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन 42,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

iPhone 7 Plus(32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन 56,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. यामध्ये 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

iPhone 8 (64GB): आयफोन 8 वर तब्बल 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या सेलमध्ये हा फोन 55,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 62,000 रुपये आहे.

iPhone 8 Plus(64GB): आयफोन 8 प्लसवर 6000 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 66,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

iPhone X (64GB): आयफोन X हा स्मार्टफोन 89,000 रुपयात लाँच करण्यात आला होता. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 82,000 रुपयात खरेदी करता येणार आहे. म्हणजे या स्मार्टफोनवर तब्बल 7 हजारांची सूट देण्यात आली आहे.

iPhone 6S (32GB): या स्मार्टफोनवर 6,000 रुपयांची सूट देण्यात आली असून 40,000 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 34,000 रुपयात खरेदी करता येईल.

iPhone 6 (32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना 25,999 रुपयात खरेदी करता येईल.

iPhone SE (32GB): या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये 20,999 रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.