Redmi 10 2022 Launch Date : Xiaomi ने आपल्या Redmi सीरीजसह यावर्षी भारतात अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. एकीकडे Redmi ने आपला K सीरीज स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. यासोबतच कंपनीने रेडमी 10 सीरीजचे नवीन स्मार्टफोन्सही भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. अलीकडेच, कंपनीने भारतीय बाजारात Redmi 10A Sport नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


आता कंपनी यानंतर लवकरच भारतात Redmi 10 सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की नवीन फोनचे नाव Redmi 10 2022 असणार आहे. याशिवाय या नवीन स्मार्टफोनचे काही फीचर्सही लीक झाले आहेत. आम्हाला या फोनच्या लीक फीचर्सबद्दल माहिती समोर येतेय


Redmi 10 2022 चे लीक फिचर्स


-6.5-इंच स्क्रीन असलेल्या Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 
-याशिवाय फोनमध्ये 90 HZ चा रिफ्रेश दर देखील दिला जाऊ शकतो.
-Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये कंपनी 2 GHz MediaTek Helio G88 ऑक्टा कोर प्रोसेसर देऊ शकते.
-कंपनी (Xiaomi) Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देऊ शकते, 
-ज्यामध्ये 50 MP मेन बॅक कॅमेरा, 8 MP दुसरा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 MP तिसरा डेप्थ कॅमेरा आणि फ्लॅशलाइटसह चौथा मॅक्रो कॅमेरा असेल.
-Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
-कंपनी आपल्या Redmi 10 2022 स्मार्टफोनचे 4 GB RAM सह 64 GB इंटरनल स्टोरेज, 4 GB RAM सह 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 6 GB RAM सह 128 GB इंटरनल स्टोरेजसह 3 प्रकार लॉन्च करू शकते.


-Redmi 10 2022 स्मार्टफोन Android 11 सह लॉन्च केला जाऊ शकतो.
-Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी असू शकते. यासोबतच फोनमध्ये 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.
-Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात.