Moto X30 Pro : हँडसेट निर्माता मोटोरोला (Motorola) कंपनी पुढील महिन्यात आपला नवीन आणि जगातील पहिला 200MP कॅमेरा सेन्सर फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने या संदर्भात सांगताना म्हटले आहे की, Moto X30 स्मार्टफोन 200-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरने भरलेला असेल. केवळ 200 मेगापिक्सेल कॅमेराच नाही तर, मोटोरोला ब्रँडच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनला वेग आणि मल्टीटास्किंगसाठी एक पॉवरफुल चिपसेट देखील मिळेल. कंपनीने आपल्या चीनी मायक्रोब्लॉगिंग साईट Weibo वर कॅमेरा सेन्सरशी संबंधित माहिती दिली आहे.


Moto X30 Pro फिचर्स : 



  • Moto X30 Pro फोनमध्ये 125W GaN फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

  • Moto X30 Pro फोन Android 12 आधारित ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह ऑफर केला जाऊ शकतो.

  • Moto X30 Pro फोनमध्ये 12 GB रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

  • Moto X30 Pro स्मार्टफोनला प्राथमिक कॅमेरा म्हणून 200-मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे, ज्यामुळे तो जगातील पहिला 200 MP स्मार्टफोन बनणार आहे.

  • Moto X30 Pro स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबतच स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळू शकतो.

  • Moto X30 Pro फोनमध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्यामध्ये HD+ रिझोल्यूशन सपोर्ट दिला जाऊ शकतो.

  • Moto X30 Pro सह 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो.

  • Moto X30 Pro फोन 128GB स्टोरेजसह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सपोर्टसह 12GB रॅमसह दिला जाऊ शकतो.


Moto X30 Pro चे फिचर्स जरी आकर्षित करणारे असले तरी मात्र, या फोनची किंमत किती असणार या संदर्भात कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 


महत्वाच्या बातम्या :