मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आज आपला सहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. याचनिमित्त आज शाओमीनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहेत. तसंच आज पहिल्यांदाच Mi 5 हा शाओमीचा नवा स्मार्टफोनही खरेदी करता येणार आहे.

 

शाओमीचा फ्लॅश सेल आज सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक डिव्हाइस आणि स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

 

फ्लॅश सेलमधील  विशेष ऑफर:

 

  • Mi5 - आजपासून हा स्मार्टफोन भारतात मिळणार आहे. mi.com या वेबसाइटवर सकाळी 11.00 वाजता, दुपारी 2 आणि 5 वाजता यासाठी सेल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्लॉलक्वॉम स्नॅपड्रॅगन 820 असणार आहे. 16 मेगापिक्सल कॅमेरा आणि गोरिला ग्लास सपोर्ट असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही आज 24,999 रु. खरेदी करु शकतात.


 

  • रेडमी नोट 3- मागील महिन्यात लाँच करण्यात आलेला रेडमी नोट 3 हा आजच्या फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.


 

  • Mi पॉवर बँक- 20,000 mAh क्षमतेची पॉवर बँक या फ्लॅश सेलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत अवघी 1,699 रु. आहे.


 

शाओमीच्या या फ्लॅश सेलमध्ये इतरही बऱ्याच ऑफर आज देण्यात आल्या आहेत. यामध्ये Mi 4 आणि रेडमी 2 प्राइम या  स्मार्टफोनच्या किंमतीत सूट देण्यात आली आहे.

 

Mi 4 स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 2 हजारांची सूट देण्यात आली आहे. तर रेडमी 2 प्राइममध्ये 500 रु. सूट देण्यात आली आहे.

 

- Mi 4 स्मार्टफोनची सध्याची किंमत 14,999 रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत 12,999 रु. असणार आहे.

 

- रेडमी 2 प्राइमची सध्याची किंमत 6,999 रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत 6,499 रु. असणार आहे.

 

तसेच बऱ्याच अँक्सेसरीजवर तुम्हाला आजच्या फ्लॅश सेलमध्ये सूट मिळू शकते. फ्लॅश सेलबाबत आणखी माहिती पुढील लिंकवर पाहता येईल. http://www.mi.com/in/events/mifans2016/