नवी दिल्ली : देशातील पहिली सेमी बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गतिमान एक्सप्रेसने पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर बरोबर 11 वाजून 50 मिनिटांनी ही ट्रेन आग्रा स्थानकात दाखल झाली.

 

दिल्ली ते आग्रा स्थानकादरम्यानचं 188 किलोमीटरचं अंतर या गाडीने निर्धारित वेळेत पार केलं. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये काही अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय अनेक सोयी-सुविधांनी ही रेल्वे सज्ज आहे.

 

या मार्गावर आतापर्यंत शताब्दी एक्सप्रेसने दोन तासात हे अंतर पार केलं आहे. पण गतिमान एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे.

 

गतिमान एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये



- गतिमान एक्स्प्रेसमध्ये विमानाप्रमाणेच रेल्वे होस्टेसही असतील.

 

- गतिमान एक्स्प्रेसच्या मार्गावर रुळ बदलण्यासाठी खास थिक वेब स्विचेस प्रणालीचा वापर

 

- वेगात अडथळा नको म्हणून वळणांवर रुळांना अधिकचा भराव

 

- एक्स्प्रेसमध्ये 10 विशेष एलएचबी कोच बसवण्यात आले आहेत

 

- कोचचं वजन कमी असल्याने ट्रेन अधिक वेगाने धावण्यास मदत होणार

 

- अपघात टाळण्यासाठी डिस्क ब्रेकची यंत्रणा लावली आहे

 

- एक्स्प्रेसच्या मार्गावर जनावरं येऊ नयेत, यासाठी रुळांच्या बाजून तारांचं कुंपण

 

पाहा व्हिडीओ