ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हॉईस कॉल आता हॅक करता येणार नाहीत.
अमेरिकेत मोबाईल कंपनी अॅपल आणि पोलिस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशील लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
याआधी व्हॉट्स अॅपवर दोन व्यक्तींमध्ये पाठवले जाणारे मेसेज सहज हॅक करता येऊ शकत होते. पण अमेरिकेत अतिरेक्यांचा आयफोन चेक करण्यासाठी एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय.
तुमचा डेटा आणि चॅट/संवाद सुरक्षित ठेवण्याला आमचं प्राधान्य आहे. हे आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तुमचा खासगी संवाद 'एंड-टू-एंड' एनक्रिप्शन'द्वारे आणखी सुरक्षीत होईल, असं व्हॉट्सअपचे संस्थापक जॅन कौम यांनी म्हटलं आहे.
"तुमचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. हॅकर्सनाही ते शक्य होणार नाही. इतकंच काय तर आम्हालाही ते पाहता येणार नाही. 'एंड-टू-एंड एनक्रिप्शन'मुळे व्हॉट्सअप चॅट आणखी सुरक्षीत होईल. अगदी समोरासमोर किंवा 'फेस ट फेस' संवाद साधल्याप्रमाणेच ते गोपनीय असेल" असा दावा व्हॉट्सअपने केला आहे.