तीन कॅमेरे असणारा शाओमीचा हा पहिलाच फोन आहे. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे दोन रिअर तर एक फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे या फोनचा कॅमेराच खरं आकर्षण असणार आहे. भारतात हा फोन भारतात कधी येणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
रेडमी नोट प्रोचे फीचर्स
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- हेलिओ X20, 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज
- हेलिओ X25, 4 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- फिंगर प्रिंट सेन्सर
या फोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी ही डीएसएलआर प्रमाणे असेल, तसंच हा फोन शाओमीच्या फोनपैकी सर्वात जबरदस्त क्षमतेचा फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे.