मुंबई: फ्लिपकार्टची फॅशन रिटेल वेबसाइट Myntra आपली स्पर्धक कंपनी jabong ला खरेदी केलं आहे. जवळजवळ 4 अब्ज 70 कोटीला ही कंपनी खरेदी करण्यात आली आहे.


 

jabong जवळ 1500 पेक्षा जास्त रिटेल ब्रांण्ड आहेत. मागील वर्षी jabong ला बरंच नुकसान सोसावं लागलं होतं. याआधी jabongला खरेदी करण्यासाठी फ्यूचर ग्रुप, स्नॅपडील, आदित्य बिर्लाच्या Abof कंपनीसह अनेक कंपन्यांसोबत बातचीत सुरु होती.

 

या डीलनंतर फ्लिपकार्टनंतर Myntra ही देशातील सगळ्यात मोटी ऑनलाइन फॅशन कंपनी बनणार आहे. तसंच अमेझॉन, स्नॅपडील याशिवाय अनेक छोट्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटला Myntraचा सामना करावा लागणार आहे.

 

2014 साली फ्लिपकार्टनं Myntraला जवळजवळ 2 हजार 20 कोटीला खरेदी केलं होतं. त्यावेळी भारतातील हे सर्वात मोठं ई-कॉमर्स डील होतं.