मुंबई : मायक्रोसॉफ्टचं विंडोज 10 मोफत अपग्रेड करण्याचं मुदत दोन दिवसांत संपणार आहे. येत्या शुक्रवारनंतर विंडोज 10 मोफत अपग्रेड करता येणार नाही. शुक्रवारनंतर अपग्रेडिंगसाठी पैसे मोजावे लागतील. भारतात विंडोज 10 सॉफ्टवेअरच्या होम व्हर्जनची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे.


 

गेल्या वर्षी 29 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 लॉन्च केला होता. प्रसिद्धीसाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 ला एक वर्षासाठी मोफत केलं होतं.

 

विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरणारे यूझर्स हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करु शकतात. मायक्रोसॉफ्टने यासाठी अपग्रेड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उद्योग क्षेत्रातील यूझर्ससाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.

 

जर तुम्हाला विंडोज 7 च्या स्टार्ट मेन्यूची कमतरता भासत असेल, तर या सॉफ्टवेअरमुळे ती कमतरता भरुन काढू शकता. इतकंच नव्हे, तर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने विंडोजला पर्सनलाईजही करु शकता. या सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट अॅपही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगळ्या अॅप्ससाठी अधिकची मेहनतही करावी लागत नाही.

 

या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमचा चेहरा किंवा आवाजाला आपल्या पीसी, लॅपटॉप किंवा टॅबचा पासवर्डही करु शकता. https://www.microsoft.com/en-in/software-download/windows10 वर जाऊन विंडोज 10 डाऊनलोड करु शकता.