मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचा आगामी स्मार्टफोन रेडमी प्रो 2 असणार आहे. मागच्या वर्षी शाओमीनं रेडमी प्रो लाँच करत होते. पण आता लाँच करण्यात येणारा रेडमी प्रो 2 यापेक्षाही हायटेक असणार आहे. चीनच्या काही वेबसाईटनं याचे काही फीचर्स लीक केले आहेत. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असण्याची शक्यता आहे.
हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये असणार आहे. 6 जीबी रॅम 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 260 डॉलर तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 230 डॉलर असण्याची शक्यता आहे.
यामध्ये स्नॅपड्रॅगन 66x सीरीज चिपसेट असण्याची शक्यता आहे. याची बॅटरी क्षमता 4500 mAh आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे.