मुंबई : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित रेडमी नोट 7 सीरिज शाओमीने भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने रेडमी नोट 7 (Redmi Note 7) आणि रेडमी नोट 7 प्रो (Redmi Note 7 Pro) भारतात लॉन्च केला आहे. 'रेडमी नोट 7'  9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर 'रेडमी नोट 7 प्रो'ची किंमत 13,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 'रेडमी नोट 7' ची विक्री 6 मार्चपासून होणार असून 'रेडमी नोट 7 प्रो'ची विक्री 13 मार्चपासून सुरु होईल. ग्राहकांना शाओमीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्टवरही हा फोन खरेदी करता येणार आहे.


Redmi Note 7 हा भारतात 3GB रॅम, 32GB स्टोअरेज (9,999 रुपये) आणि 4GB रॅम, 64GB स्टोअरेज (11,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अशाचप्रकारे Redmi Note 7 Pro देखील 4GB, रॅम, 64GB स्टोअरेज (13,999 रुपये) आणि 6GB रॅम, 128GB स्टोअरेज (16,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे.

'रेडमी नोट 7' सीरिजसोबतच कंपनीने Mi LED TV 4A Pro 80cm (32) ही लॉन्च केला आहे. याची किंमत 12,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

रेडमी नोट 7 चे (Redmi Note 7) स्पेसिफिकेशन्स

नव्या 'रेडमी नोट 7' चं डिझाईन बदलण्यात आलं आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि नवी ग्रेडिएंट फिनिशिंग देण्यात आली आहे. हा पहिला रेडमी नोट आहे, ज्यात छोटा नॉच आणि आत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅक पॅनल : रेडमी नोट 7 च्या बॅक पॅनलमध्ये ग्रेडिएंट फिनिशिंग देण्यात आली आहे.
रंग : गुलाबी, काळा, निळ्या रंगात उपलब्ध
कॅमेरा : 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 2 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. एआय फेस अनलॉक, एआय स्मार्ट ब्युटी आणि एआय सिंगल शॉट ब्लर फीचर. लो लाईट फोटोग्राफीसाठी नाईट मोड
रिझॉल्यूशन : 1080X2340
डिस्प्ले : 6.30 इंच फूल एचडी प्लस एलटीपीए, कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन
रॅम : 6GB पर्यंत रॅम
स्टोअरेज : 64GB पर्यंत स्टोअरेज
प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर
बॅटरी : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट

रेडमी नोट 7 प्रोचे (Redmi Note 7 Pro) स्पेसिफिकेशन्स

'रेडमी नोट 7 प्रो' देखील दिसायला जवळपास 'रेडमी नोट 7' सारखाच आहे. म्हणजेच 'रेडमी नोट 7 प्रो'मध्येही ग्रेडिएंट फिनिशिंग, फंकी कलर्स आणि वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्येही दोन कॅमेरे आणि फ्रंटला एक कॅमेरा देण्यात आला आहे.

कॅमेरा : रिअरमध्ये f/1.8 अपार्चरसोबत 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फेस अनलॉकचाही ऑप्शन दिला आहे. तर लो-लाईट फोटोग्राफीसाठी नाईट-मोड मिळेल.
रिझॉल्यूशन : 1080x2340
डिस्प्ले : 6.3 इंच फूल एचडी प्लस एलटीपीएस, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5,
प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर
रॅम : 6GB
स्टोअरेज : 128GB
बॅटरी : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट