नवी दिल्ली : शाओमीने नुकताच Mi A1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानंतर आता कंपनीने 5A या मॉडेलचं नवं व्हेरिएंट चीनमध्ये लाँच केलं आहे. कमी किंमत आणि जास्त फीचर्स ही या फोनची वैशिष्ट्य आहेत.


रेड मी नोट 5A च्या या नव्या व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये 1199 युआन म्हणजे जवळपास 12 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या फीचर्सचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनच्या प्रिमिअम व्हेरिएंटमध्येही दोन मॉडेल आहेत. यापैकी 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये 899 युआन म्हणजे जवळपास 8 हजार 600 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1199 युआन म्हणजे जवळपास 12 हजार रुपये आहे.

हे दोन्ही फोन मंगळवारपासून JD.com आणि Mi.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

फीचर्स :

  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर

  • 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज

  • 3080mAh क्षमतेची बॅटरी