www.tatacliq.com या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ऑफरचा लाभ घेता येईल. Redmi Note 5 Pro या फोनला भारतात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अनेकांना हा फोन खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कारण, फोनचा सेल सुरु होताच तो आऊट ऑफ स्टॉक होत होता.
या वेबसाईटवर Redmi Note 5 Pro आणि Mi A2 हे फोन एचडीएफसी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना कमीत कमी 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एवढंच नाही, तर 24 महिन्यांच्या ईएमआयवर फोन खरेदीचाही पर्याय असेल.
Redmi Note 5 Pro च्या दोन्हीही व्हेरिएंटवर (14948 रुपये आणि 17499 रुपये) ही ऑफर आहे. तर Mi A2 च्या बेस व्हेरिएंटवर ही ऑफर आहे, ज्याची किंमत टाटा क्लिकनुसार, 17 हजार 499 रुपये आहे. 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Redmi Note 5 Pro हा फोन कॅमेरा क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. या फोनचा रिअर कॅमेरा 12+5 मेगापिक्सेल, तर 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. Mi A2 हा फोनही कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या स्मार्टफोनमध्येही 12MP +20MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आहे.