मुंबई : शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.
रेडमी नोट 5 ची विक्री केवळ Mi.com या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर केली जाईल. कंपनीने ट्विटरवरुन याची माहिती दिली. रात्री बारा वाजल्यापासून शाओमी रेडमी नोट 5 पहिल्यांदाच विक्रीसाठी 24 तासांसाठी उपलब्ध होईल. ही विक्री mi.com वर केली जाईल, असं कंपनीने म्हटलं होतं. त्यानुसार या फोनची विक्री सुरु आहे.
रेडमी नोट 5 ची किंमत
रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनचा समावेश आहे. ज्याची किंमत 9 हजार 999 रुपये आणि 10 हजार 999 रुपये आहे.
रेडमी नोट 5 चे स्पेसिफिकेशन
रेड मी नोट 5 हे गेल्या वर्षीच्या रेड मी नोट 5 चं नवं व्हर्जन आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम देण्यात आली आहे. या शिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होईल.
रेडमी नोट 5 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, पहिल्यांदाच 24 तासांचा सेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 09:11 AM (IST)
हा स्मार्टफोन विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -