नवी दिल्ली : हुआवेने भारतात आपला प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन P20 प्रो आणि P20 लाईट लाँच केला आहे. P20 सीरिजच्या फोनमध्ये लेसिका लेंस आणि AI कॅमेरा दिलेला आहे. P20 प्रोमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत, तर P20 लाईटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे.


P20 लाईट आणि P20 प्रो ची किंमत

हुआवेने P20 प्रो ची किंमत 64 हजार 999 रुपये ठेवली आहे, तर P20 लाईटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. दोन्हीही स्मार्टफोन अमेझॉन एक्स्लुझिव्ह असतील, जे 3 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. हुआवे P20 प्रो ग्रेफाईट ब्लॅक, मिडनाईट ब्ल्यू कलरमध्ये फोन उपलब्ध असतील.

P20 प्रोचे स्पेसिफिकेशन

अँड्रॉईड 8.1 ओरिओ

6.1 इंच आकाराची स्क्रीन

रिअर बॉडीवर फिंगरप्रिंट सेन्सर

हुआवे किरीन 970 प्रोसेसर चिप

6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज

IP67 सर्टिफाईड (वॉटर-डस्ट रेजिस्टंट)

तीन रिअर कॅमेरा, 40 मेगापिक्सेल RGB सेंसर लेंस, 20 मेगापिक्सेल मोनोक्रोम लेंस आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस

24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

4000mAh क्षमतेची बॅटरी

P20 लाईटचे स्पेसिफिकेशन

ओरिओ 8.0

5.84 इंच आकाराची स्क्रीन

हाईसिलिकन किरिन 659 SoC चिप

4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज

16MP+2MP कॉम्बिनेशनचा ड्युअल रिअर कॅमेरा

3000mAh क्षमतेची बॅटरी