मुंबई: शाओमीनं सोमवारी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन रेडमी 4A लाँच केला. शाओमीनं आपल्या या फोनसाठी आयडियाच्या साथीनं एक खास ऑफरही आणली आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 5999 रु. आहे.


आयडिचे प्रीपेड यूजर्सनी जर शाओमी रेडमी 4A अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन खरेदी केल्यास त्याला तब्बल 28 जीबी 4जी डेटा 343 रुपयात मिळणार आहे. या प्लानमध्ये दर दिवशी 1 जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच रेडमी 4A यूजर्सला 300 मिनिटं फ्री कॉलिंग मिनिटं आणि 3000 लोकल एसटीडी मिनिटं मिळणार आहे. या पॅकची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे. ही ऑफर 30 जून 2017 पर्यंत असणार आहे.

शाओमीच्या रेडमी 4A या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. त्यामुळे या बजेट फोनला ग्राहक कितपत पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शाओमी रेडमी 4A चे खास फीचर्स:

– 5 इंच स्क्रिन आणि रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल

– ड्यूल सिम आणि पॉलिकार्बोनेट बॉडी

– मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम

– 1.4Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आणि 2जीबी रॅम

– 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

– 16 जीबी इंटरनल मेमरी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

– वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ यासारखे फीचर

– बॅटरी 3120 mAh क्षमता

संबंधित बातम्या:

शाओमीचा रेडमी 4A स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रु.