मुंबई : शाओमीने रेडमी 4A या फोनचं नवं व्हेरिएंट लाँच केलं आहे. रेडमी 4A च्या नव्या व्हेरिएंटची किंमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा वेगळेपणा म्हणजे यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.


रेडमी 4A 31 ऑगस्टपासून अमेझॉन आणि MI इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. रेडमी 4A हा लोकप्रिय फोन आहे. त्यामुळे कंपनीने आता या फोनचं नव व्हेरिएंट लाँच करुन बाजारात आणखी स्पर्धा निर्माण केली आहे.

रेडमी 4A चे फीचर्स

  • 5 इंच आकाराची स्क्रीन

  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर

  • 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3120 mAh क्षमतेची बॅटरी


या फोनची माहिती शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.