मुंबई : सॅमसंगने गॅलक्सी नोट 8 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता मिड बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J7 प्लस लाँच केला जाणार आहे. लाँचिंगपूर्वी या फोनचे काही फीचर्स आणि पहिला फोटो समोर आला आहे.


वीबो (चिनी सोशल मीडिया) युझरने गॅलक्सी J7 प्लसचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनुसार या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल. ज्यामध्ये एक 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा असेल. शिवाय 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.



शिवाय या फोनमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल, असंही बोललं जात आहे. 4GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. गॅलक्सी J7 प्लसमध्ये अँड्रॉईडची 7.1.1 नॉगट सिस्टम असेल. तर 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या J7 (2017) या फोनप्रमाणेच या फोनची डिझाईन असेल, असंही बोललं जात आहे. लीक रिपोर्ट्सनुसार गॅलक्सी J7 प्लसमध्ये फिंगरप्रिंट सेंसर होम बटणमध्येच असेल.