मुंबई: शाओमीनं गुरुवारी आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Mi मॅक्स लाँच केला आहे. कंपनीचा हा आजपर्यंतचा सगळ्याळात मोठा स्मार्टफोन आहे. ज्याची किंमत 14,999 रु. आहे. Mi मॅक्सचा पहिला फ्लॅश सेल Mi.com वर 6 जुलैला असणार आहे. या नव्या फ्लॅगशीपसाठी गुरुवारीच नोंदणी सुरु झाली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीनं ROM MIUI 8 लाँच केला आहे.

 

या स्मार्टफोनला कंपनीनं भारतात स्नॅपड्रॅगन 650 SoC, 32 जीबी स्टोरेज सोबत लाँच केला आहे. चीनमध्ये या फोनचे तीन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. शाओमीनं असंही सांगितलं की, भारतात या स्मार्टफोनचं 4 जीबी रॅम व्हेरिएंटही लाँच करण्यात येईल. ज्याची किंमत 19,999 रु. असेल.

 

शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोनच्या फीचर पाहिल्यास याचा डिस्प्ले 6.44 इंच आहे. शाओमीचा हा हँण्डसेट मात्र मेटल बॉडी लेस आहे. यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची बॅटरीही फारच दमदार आहे. 4850 mAh क्षमेतीच बॅटरी आहे. हा फोन 4जी सपोर्टिव्ह आहे.