अँड्रॉईड नॉगट, अँड्रॉईडचं नवीन व्हर्जन
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 05:34 PM (IST)
मुंबईः अँड्रॉईड एनचं अँड्रॉईड नॉगट हे नवीन व्हर्जन लवकरच युझर्सच्या भेटीला येणार आहे, असं गुगलने जाहीर केलं आहे. युझर्स नावाबद्दलचं आपलं मत देखील कंपनीला कळवू शकतात, असंही कंपनीने म्हटलं आहे. https://twitter.com/Android/status/748547400210472961 नॉगट हे अँड्रॉईडचं लेटेस्ट व्हर्जन असणार आहे, असं गुगलने मार्चमध्ये जाहीर केलं होतं. या व्हर्जनमध्ये मोबाईलची कार्यक्षमता वाढवणे, मल्टीटास्किंग अशी अनेक अपडेटेड फीचर्स असणार आहेत.