नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस बनवणारी कंपना शाओमीने आता पेनही लाँच केला आहे. हा पेन म्हणजे, स्मार्ट डिव्हाईस आहे. याची किंमत 3 डॉलर म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे फक्त 200 रुपये आहे. यापूर्वीही कंपनीने राईस कुकर, कॅटली, ड्रोनसारखे स्मार्ट प्रोडक्ट लाँच केले आहेत.

 

शाओमीचा हा पेन नॉर्मल रिफील पेन आहे. ज्यामध्ये Swis PREMEC रिफीलचा वापर होतो. सध्या हा स्मार्टपेन ब्लॉक आणि व्हाईट रंगातच उपलब्ध आहे. शाओमीचा हा पेन वापरासाठीही अतिशय उत्तम आहे. याच्या ग्रीपने आपल्या बोटांना त्रास होत नाही. याची परफेक्ट जाडी लिहण्यासाठी अतिशय सोईची आहे.

 

या पेनचे वजन फक्त 20 ग्रॅम आहे. कॉपर मेटलने बनवलेल्या हा पेन तुम्हाला दीर्घकाळ वापरता येऊ शकतो. सध्या हा पेन लाँच झाल्यापासून ऑनलाईन शॉपिंग साईटवर आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. त्यामुळे आता हा फक्त शाओमी स्टोअर्सवरच उपलब्ध असणार आहे.