मुंबई : ट्विटर फॉलोअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानला मागे टाकत दुसरा नंबर पटकावला आहे. ट्विटर फॉलोअर्समध्ये पहिल्या स्थानावर महानायक अमिताभ बच्चन हे कायम आहेत.   गेल्या काही दिवसांपासून मोदी आणि शाहरुख यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत एकप्रकारची स्पर्धा दिसून येत होती. मात्र, आता पंतप्रधान मोदी फॉलोर्सच्या संख्येत शाहरुखपेक्षा खूप पुढे निघूल गेले आहेत.   अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर 21.7 मिलियन फॉलोअर्स असून, ते कायम पहिल्या स्थानावर आहेत. तर दुसऱ्या स्थानासाठी मोदी आणि शाहरुख यांच्यामध्ये चढाओढ होती. मात्र, आता मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 21.5 मिलियन, तर शाहरुखच्या फॉलोअर्सची संख्या 20.5 मिलियन झाली आहे. त्यामुळे मोदी शाहरुखला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.   भारतातील टॉप-5 ट्विटर फॉलोअर्स असलेले सेलिब्रेटी:  
  1. अमिताभ बच्चन - 21.7 मिलियन
  2. नरेंद्र मोदी - 21.5 मिलियन
  3. शाहरुख खान - 20.5 मिलियन
  4. सलमान खान - 18.7 मिलियन
  5. आमिर खान - 18.2 मिलियन