‘बजाज V15’चा विक्रम, आतापर्यंत 1 लाख बाईक्सची विक्री
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 11:41 AM (IST)
मुंबई : बजाज ऑटोची कम्प्युटर बाईक V15 ने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. बजाज V15 च्या आतापर्यंत 1 लाखांहून अधिक बाईक्सची विक्री झाली आहे. या बाईकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांतच्या स्टीलपासून तयार करण्यात आली आहे. अभिनेता आमीर खाननेही बाजाज V15 बाईक खरेदी केली आहे. बजाज V15 बाईक 150 सीसी सेगमेंटमधअये एक नव्या पर्यायाच्या रुपाने बाईकप्रेमींसमोर आली आहे. लॉन्चिंगनंतर ही बाईक दर महिन्याला सरासरी 25 हजार बाईकची विक्री झाली आहे. एप्रिल 2016 मध्ये सर्वात जास्त विक्री झालेल्या 10 बाईक्सच्या यादीतही बजाज V15 चा समावेश होता. बजाजचे मोटरसायकल सेल्स प्रेसिडंट या बाईकबद्दल बोलताना सांगतात, “बजाज V15 बाईक गौरवशाली इतिहासाची आठवण करुन देते. ही बाईक भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळाली. येत्या सप्टेंबरपासून बाईकच्या प्रॉडक्शनमध्ये वाढ केली जाणार असून, डिलिव्हरीही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”