मुंबई : प्रसिद्ध चीनी मोबाईल कंपनी शाओमीनं आपल्या 'शाओमी मेरी' च्या लाँचिंगची तयारी चालवली आहे. तसंच या स्मार्टफोनचं नाव 'Mi 5c' असंही ठेवणार असल्याची चर्चा आहे.
12 डिसेंबरला शाओमीचा हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. हुवाई आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनसारखाच या स्मार्टफोनमध्येही 'Pine Cone' प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन रोझ गोल्ड, गोल्ड आणि ब्लॅक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
शाओमी Mi 5c चे फिचर्स
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉईड मार्शमेलो 6.0
रॅम 3 जीबी
प्रोसेसर 1.4GHz पाईन कोअर प्रोसेसर
डिस्प्ले 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन
किंमत 14,800 रुपये अंदाजे