नवी दिल्ली : रिलायन्स जिओची 4G अनलिमीटेड ऑफर संपत आली असली तरी रिलायन्स आणखी ग्राहक जोडण्याचे प्रयत्न करत आहे. रिलायन्सने आता सोसायटी, कार्यालये अशा ठिकाणी जाऊन सिम वाटप सुरु केलं आहे. शिवाय कंपनी होम डिलीव्हरी देण्याच्या तयारीत आहे.

जिओ सिमची सेवा घरपोच देण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, दिल्लीसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरु होणार आहे.

रिलायन्स जिओ घेण्यासाठी केवळ आधार क्रमांक गरजेचा आहे. त्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी मोठी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि रहिवाशी इमारतींमध्ये सिम देत आहेत.

रिलायन्स स्टोअरमध्ये ग्राहकांची सिम खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता कंपनीने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. जिओची 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याने कंपनीने अधिकाधिक ग्राहकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

रिलायन्स जिओच्या ऑफर्स
19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही)
999 रुपयात 10 GB डेटा – रात्री अनलिमिटेड 4G
1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G

संबंधित बातम्याः


जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी


..म्हणून रिलायन्स जिओ सिम फक्त दोन रंगांत उपलब्ध


रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा


रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा


रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा


Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!