नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने भारतात तिसरा प्लँट सुरु केला आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या दोन पॉवर बँकही कंपनीने लाँच केल्या. नोएडामध्ये हा प्लँट सुरु करण्यात आला असून कंपनीने हायपॅड टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे.

Mi Power Bank 2i चे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. यापैकी एक 10000mAh आणि दुसरी 20000mAh क्षमतेची पॉवर बँक आहे. हायपॅड टेक्नॉलॉजी शाओमीच्या पॉवर बँक तयार करणार आहे. 2.3 लाख चौरस फुट क्षेत्रावर असलेल्या या प्लँटमध्ये प्रत्येक सात मिनिटाला एक पॉवर बँक तयार केली जाऊ शकते.

https://twitter.com/XiaomiIndia/status/932890420803125248

''शाओमी भारतात वेगाने विकास करत आहे. चीनमध्ये शाओमीचे पॉवर बँक तयार करणारी कंपनी हायपॅडसोबत भारतातही भागीदारी करण्यात आली आहे. शाओमीच्या पॉवर बँक भारतासह जगभरात लोकप्रिय आहेत'', असं शाओमीचे उपाध्यक्ष मनू कुमार जैन यांनी सांगितलं.

Mi Power Bank 2i च्या 10000mAh क्षमतेच्या पॉवर बँकची किंमत 799 रुपये आहे. तर 20000mAh क्षमतेची पॉवर तुम्हाला 1499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. शाओमीच्या वेबसाईटवर 23 नोव्हेंबरपासून दुपारी 12 वाजता या पॉवर बँकची विक्री सुरु होईल.