बंगळुरु : जवळजवळ वर्षभरापूर्वी स्वस्त इंटरनेट बाजारात आणून रिलायन्स जिओनं सर्वच दूरसंचार कंपन्यांची अक्षरश: झोप उडवली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्वस्त आणि मस्त इंटरनेट सेवा देणारी कंपनी म्हणून जिओची ओळख झाली आहे. पण आता जिओपेक्षाही स्वस्तात इंटरनेट सेवा देणारी कंपनी बाजारात आली आहे.
नव्या स्टार्टअप कंपनीनं दिलेल्या या ऑफरनं रिलायन्स जिओलाच्या ऑफर्सनाही टक्कर दिली आहे. ‘वायफाय डब्बा’ असं या कंपनीचं नाव असून अवघ्या २ रुपयांत वायफाय वापरता येणार आहे.
केवळ २ रूपयात तुम्हाला १०० एमबी डेटा मिळेल, तर २० रूपयात १ जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ २४ तासासाठी असणार आहे. बंगळुरुमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे.
ज्यांना रिचार्ज करायचं असेल त्यांना कंपनीचं डेटा प्रीपेड रिचार्ज कूपन घ्यावं लागेल. हे कूपन बंगळुरुतील छोट्या दुकानांवर सहज उपलब्ध होईल. ही कंपनी सध्या बंगळुरुत आपली सेवा देत असली तरी लवकरच इतर शहरातही आपली सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे आता वायफाय डब्बा ही नवीन कंपनी बाजारात आल्याने इतर कंपन्या काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
फक्त दोन रुपयात इंटरनेट, जिओला टक्कर देणारी नवी कंपनी बाजारात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2017 09:10 PM (IST)
केवळ २ रूपयात तुम्हाला १०० एमबी डेटा मिळेल, तर २० रूपयात १ जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ २४ तासासाठी असणार आहे.
फोटो सौजन्य : वाय-फाय डब्बा व्हिडीओ
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -