मुंबई: शाओमीने आपल्या मेमरी एक्सपांडेबल सिरीजमधील स्मार्टफोन लाँच केला आहे. MI Max या नावे ही सिरीज लाँच करण्यात आली असून 16GB, 32GB, 64GB आणि 128GB वेरिएंटचे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या सिरीजमधील 16GB मेमरीचा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 12,100रुपये आहे.
शाओमीच्या या सिरीजमधील इतर स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही. चायनीज गॅजेट वेबसाइट गिज्मोचाइनाने दिलेल्या माहितीनुसार, 16GBच्या या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz क्वालकॉम 650 हेक्साकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमीच्या लाँच होणाऱ्या 32GBच्या स्मार्टफोनमध्येही 1.8GHz क्वालकॉम 650 हेक्साकोर प्रोसेसर आणि 3GB रॅम देण्यात आलेला आहे. याची किंमत 15000रुपये असण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारे 64GB स्टोअरेज आणि 3GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 17000रुपये असेल. तर 128GB आणि 4GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 20500रुपये असले. 64GB आणि 128GB वेरिएंटच्या फोनमध्ये 1.8GHz क्वालकॉम 652 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे.
भारतात सध्या शाओमीचा 32GBचाच स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. याचे इतर वेरिएंटचे स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 32GBच्या स्मार्टफोनची किंमत 14,999रुपये आहे.
MI Max चे फिचर्स
शाओमीच्या MI Max स्मार्टफोनमध्ये मॅटेलिक बॉडी देण्यात आली आहे. 6.4 इंचाचा फुल एचडी स्क्रिन आणि 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरासोबतच 85 डिग्रीचा वाइड एंगल देण्यात आला आहे. डुअल सिमल सपोर्ट या फोनमध्ये ब्लूटूथ, वायफायसारखे फिचर देण्यात आले आहेत. बॅटरी बॅकअपसाठी 4850mAhची बॅटरी देण्यात आली आहे.