मुंबई: सर्वात स्वस्त स्मार्टफोन अशी जाहिरात करुन चर्चेत आलेला स्मार्टफोन फ्रीडम 251ची विक्री 8 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून होणार आहे. रिंगिंग बेल्स उद्यापासून आपल्या स्वस्त स्मार्टफोनचं वितरण सुरु करणार आहे.


रिंगिंग बेल्सचे संचालक मोहित गोयल यांनी सांगितलं की, 'आम्ही पहिल्या टप्प्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन असं 5000 फोन डिव्हाइसची डिलिव्हरी सुरु करणार आहोत.' तसेच कंपनीनं 9,990 रुपयात एलईडी टीव्ही देखील लाँच केला आहे.

संचलाकांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 251 रुपयाच्या किंमतीवर दोन लाख स्मार्टफोन विक्रीसाठी तयार आहे. पण यासाठी त्यांना सरकारच्या सहयोगाची देखील गरज आहे. गोयल यांनी दावा केला आहे की,

मधल्या काळात या स्मार्टफोनबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी याचं बुकींग रद्द केलं होतं. तेव्हा त्यांचे पैसे परत करण्यात आले होते.

गोयल यांनी दावा केला आहे की, मोबाइलची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन भारती सॉफ्टबँकेच्या हाइक मेसेंजरशी जोडण्यात आलं आहे. याच वेळेस कंपनीने 699 आणि 999 रुपयाच्या किंमतीचे चार नवे फीचर आणि 3999 ते 4449 रु. किंमतीचे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.