मुंबई: महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाची पहिली पसंती असलेल्या एबीपी माझाने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. वाचक/प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिल्यामुळे, एबीपी माझाच्या फेसबुक पेजने 30 लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे.
क्षणाक्षणाचे प्रत्येक अपडेट नेटीझन्सना फेसबुकवर मिळत असल्यानेच, एबीपी माझाचं फेसबुक पेज मराठी विश्वात नंबर वन बनलं आहे. बातम्यांशिवाय विविध फोटो, व्हिडीओ, पोल यांनाही प्रेक्षकांची पसंती आहे.
फेसबुकवर महिन्याला जवळपास 1 कोटी 54 लाख इतका रीच आहे. म्हणजेच जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त फेसबुक युझर्सपर्यंत 'माझा'च्या पोस्ट पोहोचतात.
तर पोस्ट एन्गेजमेंट जवळपास 5 कोटीच्या घरात आहे. पोस्ट एन्गेजमेंट म्हणजे एबीपी माझाच्या पोस्टला युझर्स करत असणारे लाईक्स, कमेंट, शेअर्स यांचा तपशील होय.
याशिवाय माझाच्या पेजवरील फेसबुक व्हिडीओला तब्बल 5 कोटींच्या घरात व्ह्यूव्ज मिळतात. एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ यूट्यूबप्रमाणे फेसबुकवरही पाहू शकता.
फेसबुकशिवाय www.abpmajha.in या वेबसाईटला दररोज लाखो लोक भेट देतात. त्यामुळेच एबीपी माझाची वेबसाईट महिन्याला 5 कोटी पेजव्ह्यूवचा टप्पा पार करते.
सुपरफास्ट अपडेट, सविस्तर बातम्या, दिग्गजांचं विश्लेषण, ब्लॉग, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेश, टेक्नॉलॉजी, जॉब, लाईफ-स्टाईल, सात-बारा आणि लाईव्ह टीव्ही यासारख्या सेक्शन्सद्वारे आम्ही नेटीझन्सना अपडेट ठेवतो.
याशिवाय ट्विटरवरही माझाचं ट्विटर हॅण्डल @abpmajhatv हे लवकरच 3 लाखांचा टप्पा पार करणार आहे. हे सुद्धा मराठीतील नंबर एक ट्विटर हॅण्डल आहे.
दुसरीकडे एबीपी माझा वाहिनीवरील प्रत्येक बातमीचा स्वतंत्र व्हिडीओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. https://www.youtube.com/abpmajhalive या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला एबीपी माझाचे सर्व कार्यक्रम पाहता येतील.
याशिवाय गुगल प्लस, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तुम्ही एबीपी माझाला फॉलो करुन अपडेट राहू शकता.