Disney+ Hotstar Plan Offer : व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar Android युजर्ससाठी ख्रिसमस गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. हॉटस्टार युजर्ससाठी स्वस्तात मस्त मंथली सब्स्क्रिप्शन प्लान लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी सिलेक्टेड पेमेंट मेथड्सवर कमीत कमी 49 रुपये महिना प्लानचं टेस्टिंग करत आहे. हा प्लान एड-सपोर्टेड आहे आणि सब्स्क्राईबर्सना स्मार्टफोन किंवा टॅबलेट्सवर संपूर्ण Disney+ Hotstar कॅटलॉगचा एक्सेस मिळणार आहे. दरम्यान, हा प्लान घेतलेला युजर एकाच वेळी केवळ एकाच डिव्हाइसमध्ये लॉगइन करणं शक्य असणार आहे. युजर्सना 720p HD व्हिडीओ रिझॉल्यूशन आणि स्टिरियो ऑडियो क्वॉलिटी मिळेल. Disney+ Hotstar ने आपल्या युजर्सना कस्टमर सपोर्टमार्फत ही माहिती दिली आहे. 


आतापर्यंत Disney+ Hotstarचे जवळपास सर्वच प्लान एक वर्षांचे आहेत. Disney+ Hotstar चं हे पहिलं मंथली सब्स्क्रिप्शन आहे, जे युजर्ससाठी टेस्ट करण्यात येत आहे. काही Android युजर्सना यापूर्वीच Disney+ Hotstar वर हा प्लान दिसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर नव्या प्लानचे स्क्रिशशॉर्ट शेअर केले आहेत. जर युजर्सनी कार्ड, पेटीएम, फोनपे किंवा युपीआयचा वापर करुन पेमेंट केलं तर डिज्नी + हॉटस्टारकडून त्यांना 99 रुपयांचा प्लान 49 रुपयांना दिला जात असल्याची चर्चा आहे. 


Disney+ Hotstar चे प्लान 


सध्या Disney+ Hotstar 299 रुपये प्रति महिन्याला 6 महिन्यांच्या सब्स्क्रिप्शन प्लानवर 100 रुपयांची सूटही देत आहे. सध्या युजर्स हे सहा महिन्यांसाठी 199 रुपये प्रति महिन्याला भरुन सब्स्क्रिप्शन करु शकतात. यंदाच्या वर्षात सप्टेंबरमध्ये Disney+ Hotstar ने  आपल्या 399 वार्षिक व्हीआयपी सब्स्क्रिप्शनची घोषणा केली आहे. या प्लानमध्ये संपूर्ण कंटेन्टचा एक्सेस मिळणार आहे. 


आता Disney+ Hotstar द्वारे सादर करण्यात आलेले सध्याचे तीन सब्स्क्रिप्शन प्लान आहेत. यामध्ये 499 रुपयांचं वार्षिक सब्स्क्रिप्शन आहे. 899 रुपयांमध्ये एका वर्षासाठी सुपर आणि 1499 मध्ये एका वर्षासाठी प्रीमियम देण्यात येतो. दुसऱ्या फायद्यांसह प्रिमियम सदस्य असणारे युजर्स एकाच वेळी 4 डिव्हाइसवर 4K व्हिडीओ क्वॉलिटीसह साइन अप करु शकतात. Disney+ Hotstar सुपर युजर्स एचडी व्हिडीओ क्वॉलिटीसह 2 डिव्हाइसवर एकत्र लॉगइन करु शकता. तर 499 चा बेस प्लान एकाच डिव्हाइसपुरता मर्यादित असणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह