मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर हे सोशल मीडिया अॅप्स जितके आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत, तितकंच आपल्या चॅटिंगचा अविभाज्य भाग आहेत, ते इमोजी. समोरासमोर संवाद साधताना शब्द अपुरे पडले, की डोळे, स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव आपल्या मनातल्या भावना पोहचवतात. मात्र जेव्हा टेक्स्टच्या माध्यमातून नेमका अर्थ समजत नाही, तेव्हा इमोजी आपलं काम करतात. 17 जुलै या 'वर्ल्ड इमोजी डे'च्या निमित्ताने या इमोजींची जन्मकथा वाचणं रंजक ठरेल.
याहू मेसेंजरमध्ये इमोजींचा वापर सुरु झाल्याचं म्हटलं जातं. 2010 मध्ये मोबाईल ऑपरेटिंग सिस्टममध्ये त्यांचं रुपांतर झाल्यानंतर इमोजी प्रचलित झाले. मात्र इमोजींची सुरुवात 1998 मध्ये झाल्याचं आढळतं. शिगेताका कुरिता या इंजिनिअरने एनटीटी दोकोमो या जपानी मोबाईल ऑपरेटरसाठी इमोजी तयार केले होते.
इमोजींना कशी मान्यता मिळते?
'युनिकोड संघटने'चे सदस्य दरवर्षी इमोजींसाठी मतदान करतात. या सदस्यांमध्ये नेटफ्लिक्स, अॅपल, फेसबुक, गुगल, टिंडर, ट्विटर यांचा समावेश आहे. मतदानानंतर इमोजींची अधिकृत यादी जाहीर होते. अँड्रॉईड, आयओएस सारख्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम्स आपल्या प्लॅटफॉर्मवर त्या प्रसिद्ध करतात.
इमोजी 12.0 फीचरमध्ये लिंगभेद नसलेल्या इमोट आयकॉन्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्वचेचे अधिकाधिक वर्णही समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लैंगिकतेबाबतही भेद करण्यात आलेला नाही.
सर्वाधिक वापर होणारे इमोजी
1. अश्रूंसह हास्याचा गडगडाट
2. हृदय (प्रेम)
3. पुनर्प्रक्रिया (रिसायकल)
4. डोळ्यात हार्ट
5. हार्ट शेप (पत्त्यातील बदाम)
6. जोराने रडणारा
7. गुलाबी गालांसह लाजून हसणारा
8. कुसकेपणाचं निदर्शन (या इमोजीचं नेमकं वर्णन कठीण आहे)
9. दोन हार्ट शेप
10. किस देणारा चेहरा
सर्वात कमी वापरले जाणारे इमोजी
1. कॅपिटल एबीसीडी
2. रोप वे
3. पिण्यायोग्य नसलेलं पाणी
4. सिम्बॉल्स
5. स्मॉल एबीसीडी
6. स्मॉल एबीसी
7. पासपोर्ट कंट्रोल
8. केबल कार
9. कचरा टाकण्यास बंदी
10. डोंगराळ भागातील ट्रेन
#WorldEmojiDay : सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी कोणते?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2019 02:06 PM (IST)
अश्रूंसह हास्याचा गडगडाट आणि हृदय हे सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी आहेत. 17 जुलै या 'वर्ल्ड इमोजी डे'च्या निमित्ताने ही माहिती समोर येत आहे
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -