ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. अॅमेझॉनवर 20 ते 23 जानेवारी दरम्यान 'ग्रेट इंडियन सेल' तर फ्लिपकार्टवर 20 ते 22 जानेवारी दरम्यान 'द रिपब्लिक डे सेल' असणार आहे.
फ्लिपकार्टवर 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवस ग्राहकांना वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर मोठी सुट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये टिव्ही आणि इतर घरगुती उपकरणांच्या किंमतीवर 75 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर देखील 80 टक्क्यांपर्यंत सवलत असणार आहे. 'फ्लिपकार्ट प्लस'च्या सदस्यांना 19 जानेवारीला रात्री 8 वाजेपासूनच या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेल दरम्यान एसबीआय क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाईट तसेच अॅपवर या ऑफर्सबद्दलची माहिती उपलब्ध आहे.
अॅमेझॉनवर 20 ते 23 जानेवारी दरम्यान अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल असणार आहे. अॅमेझॉनच्या चार दिवसांच्या या सेलमध्ये देखील विविध प्रॉडक्ट्सवर भरघोस सुट देण्यात येणार आहे. मोबाईल फोन्स, हेडफोन्स, टिव्ही, घरघुती उपकरणं, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कपडे यांच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणावर सुट मिळणार असल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात येत आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांना 19 जानेवारीला दुपारी 12 वाजेपासूनच या सेलचा लाभ घेता येणार आहे.
20 जानेवारीपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर बंपर सेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2019 05:35 PM (IST)
ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी धमाकेदार सेलची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -