मुंबई : मुंबईतील 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा सुरु करण्यात आली आहे. 18 डिसेंबर रोजी रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण झालं. यावेळी मुंबईतील 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधाही सुरु करण्यात आली. वाय-फायचा स्पीड 1GBps असेल. कुठल्या रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा?
  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
  2. भायखळा
  3. कुर्ला
  4. वाशी
  5. बेलापूर
  6. ठाणे
  7. बोरिवली
  8. अंधेरी
  9. पनवेल
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया'चं स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वेमंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. मोफत वाय-फाय सुविधा हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.", असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. शिवाय, 2016 च्या अखेरपर्यंत एकूण 100 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्याचं आश्वासनही पूर्ण करु, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले. https://twitter.com/Central_Railway/status/810396608324104192 ऑफिसला जाणाऱ्या तरुणांनी रेल्वेतून प्रवास करावा, यासाठी वाय-फाय सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि हाच तरुण वर्ग मोफत वाय-फाय सुविधेचा टार्गेट आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.