Tech News : बरेचदा लोक तक्रार करतात की घरात Wi-Fi राऊटरचा स्पीड स्लो आहे. इंटरनेटचे चांगले प्लान घेतल्यानंतरही नेट खूप स्लो चालते. आपण देखील या समस्येचा सामना करत असाल तर तुमची समस्या सुटू शकते. वाय-फायचा स्पीड कसा वाढवायचा याच्या काही सोप्या टिप्स यासह कोणतं राऊटर खरेदी करावं हे देखील पाहुया.

Continues below advertisement

वाय-फाय योग्य ठिकाणी सेट करा

वाय-फायच्या चांगल्या स्पीडसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये अशा ठिकाणी वाय-फाय राउटर करा जेणेकरुन त्याची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. राऊटर जमिनीवर किंवा भिंतीवर ठेवू नका. तसेच, हे लक्षात ठेवावे की त्याभोवती कोणतीही धातूची वस्तू नसावी.

Continues below advertisement

अपडेट

स्मार्टफोनप्रमाणेच, वेळोवेळी वाय-फाय राउटर करत राहा जेणेकरून तो चांगला स्पीड देऊ शकेल. आपण ज्या कंपनीचे राऊटर वापरता त्या कंपनीच्या वेबासाईटवर जाऊन नवनवीन अपडेटविषयी माहिती घ्या.

अॅन्टिना

बर्‍याचदा वाय-फाय राउटरमध्ये, अँटिना खराब होते, ज्यामुळे वाय-फायचा स्पीड कमी होतो. असे बरेच राउटर आहेत ज्यांचे अँटिना बदलले जाऊ शकतात आणि आपणास चांगला वाय-फाय स्पीड मिळू शकेल.

रिपिटर्स

जर आपल्या वाय-फायची रेंज घरात एखाद्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास आपण रिपीटर्स वापरू शकता. यासाठी आपण केबल वापरू शकता, यासह आपण वाय-फाय सिग्नलची रेंज वाढवू शकता.

सेटिंग्ज बदला

जर एखादी वेबसाइट वाय-फाय वापरत असताना उघडण्यास बराच वेळ घेत असेल तर आपल्याला त्याच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. आपण वाय-फाय राउटर सेटिंग्जमध्ये जाऊन दुसरे DNS वापरू शकता. आपण Google चा पब्लिक DNS वापरू शकता. यानंतर आपली वेबसाइट उघडण्याचा स्पीड वाढेल.

आपण कोणता वाय-फाय राउटर विकत घ्यावा?

जर आपला वाय-फाय राउटर जुना झाला आहे आणि आपल्याला नवीन वाय-फाय राउटर खरेदी करायचा असेल तर आपण ड्युअल बँड राउटर खरेदी करा. ते आपल्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात Wi-Fi सिग्नल पोहोचवू शकतात.