WhatsApp Tips and Tricks : व्हाट्सअॅप (WhatsApp) च्या फ्रेंडली फीचर्समुळे हे अॅप जगभरात सर्वात जास्त वापरले जाते. व्हाट्सअॅप आपल्या युजर्सच्या गरजेनुसार नवनवीन फीचर्स आणत असते. संपूर्ण जगात लोक चॅटिंगसाठी सर्वात जास्त व्हाट्सएप वापरतात. आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्स आणि ऑफिस सहकाऱ्यांशी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गप्पा मारतो, माहिती, चुटकूले शेअर करत असतो. मात्र, अनेकदा आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतात. याचा अनेकांना त्रास होतो.
मात्र, आता आपल्या परवानगीशिवाय कोणीच कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊ शकत नाही. यासाठी आपल्याला व्हाट्सअॅप सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. या सेटिंग्जनंतर आपल्या परमीशनशिवाय आपल्याला कोणीही ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊ शकत नाही.
- सर्व प्रथम, आपले व्हॉट्सअॅप उघडा, नंतर वरच्या उजवीकडे दिलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
- आता सेटिंग्ज ऑप्शनवर जा आणि नंतर अकाउंटवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
- आता खाली ग्रुप्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तीन पर्याय दिसतील
- आता सर्वात सर्वात वरती ग्रीन कलरमध्ये who can add me to groups लिहलेलं असेल. म्हणजे मला ग्रुपमध्ये कोण जोडू शकते.
- या तीन ऑप्शनमध्ये एक असते Everyone, ज्यावर क्लिक केल्यानंतर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकते.
- दुसरा My Contacts, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त कॉन्टॅक्टमध्ये असलेलेच लोक ग्रुपमध्ये घेऊ शकतात.
- तिसरा ऑप्शन असतो MY Contact Expect, याचा अर्थ कॉन्टॅक्टमधील लोकही तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकत नाही.
- आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही ऑप्शन वापरु शकता
- आता कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकत नाही.