Samsung Smartphone Wifi Calling : जेव्हा वाय-फाय कॉलिंग पहिल्यांदा सुरू करण्यात आले तेव्हा ते नेटवर्क कॉलिंगसाठी 'धोका' मानले जात होते. नंतर,टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्सने त्यांच्या iffy नेटवर्कसाठी चांगली कॉलिंग सुविधा प्रदान करण्यासाठी वाय-फाय कॉलिंग सुविधा जोडण्यास सुरुवात केली.
वाय-फाय कॉलिंग हे काहीसे VoIP कॉलिंग सारखेच आहे, ते वेगळे अॅप म्हणून न करता तुमच्या नियमित मोबाईल डायलरसह काम करते. वाय-फाय कॉलिंग फीचरशी संबंधित नेटवर्कचा उपयोग अशा ठिकाणी कॉल करण्यासाठी आहे ज्या ठिकाणी नेटवर्क कनेक्शन कमी असेल.
अधिकतर लेटेस्ट स्मार्टफोन आता या फीचरला सपोर्ट करतात. सॅमसंग मोबाईलसुद्धा यांस सपोर्ट देतात आणि ही सुविधा त्यांच्या मिडल रेंज मॉडेलमध्येसुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनवर वाय-फाय कॉलिंग सक्षम केले आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर सॅमसंग स्मार्टफोनसाठी काही सोप्या पद्धती फॉलो करा.
वाय-फाय कॉलिंग कसे enable करावे ?
- सर्वप्रथम तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनवर सेटिंग्ज उघडा.
- आता कनेक्शन वर जा.
- आता वाय-फाय कॉलिंग पर्याय शोधा आणि तुमच्या डिव्हाइसवर वाय-फाय कॉलिंग चालू करण्यासाठी, वाय-फाय कॉलिंग पर्यायाच्या पुढील टॉगल चालू करा.
वाय-फाय कॉलिंग कसे disable करावे ?
- प्रथम सेटिंग्जवर जा आणि कनेक्शनवर टॅप करा.
- येथे, ते disable करण्यासाठी Wi-Fi कॉलिंग पर्यायासमोरील टॉगल बंद करा.
- लक्षात ठेवा, वाय-फाय कॉलिंग वापरण्यास सक्षम होण्यासाठी, तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy M53 : 108 मेगा पिक्सलच्या दमदार कॅमेरासह सॅमसंग गॅलॅक्सी एम53 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
- Amazon Sale : Oppo च्या या स्मार्टफोनवर लॉन्च होताच 20 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध, वाचा सविस्तर
- Oppo F21 Pro : Oppo F21च्या सीरिजचे दोन धमाकेदार स्मार्टफोन भारतात लॉन्च, 'हे' आहेत दमदार फीचर्स