Samsung Galaxy M53 : सॅमसंग गॅलॅक्सी एम53 5G हा स्मार्टफोन शुक्रवारी भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 108-मेगापिक्सेल क्वाड रियर जबरदस्त कॅमेरा सेटअप आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एम53 5G ‘Android 12’ या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy M53 5G ची भारतातील किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. या फोनच्या 6GB + 128GB स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते. तर, 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. हा फोन निळ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 29 एप्रिल रोजी, दुपारी 12 वाजल्यापासून Amazon, Samsungच्या अधिकृत वेबसाईटद्वारे याची विक्री सुरू होईल.
काय आहेत फोनचे खास फीचर्स?
ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉट असणारा Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.1 सिस्टिमवर चालतो. यात 6.7-इंचाचा फुल-एचडी+(1,080x2,400 पिक्सेल) इन्फिनिटी O सुपर AMOLED + डिस्प्ले आहे. या फोनमध्ये गोरिला ग्लास 5चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे.
जबरदस्त कॅमेरा सेटअप!
सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर लेन्ससह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चर लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. यात f/2.4 अपर्चर लेन्ससह 2-मेगापिक्सेल डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Amazon Sale : Oppo च्या या स्मार्टफोनवर लॉन्च होताच 20 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध, वाचा सविस्तर
- Oppo F21 Pro : Oppo F21च्या सीरिजचे दोन धमाकेदार स्मार्टफोन भारतात लॉन्च, 'हे' आहेत दमदार फीचर्स
- Lenovo Tablet On Amazon : आनंदाची बातमी! 'या' Lenovo टॅबलेटवर मिळतेय चक्क 50 टक्क्यांची सूट
- Amazon Sale : Alexa वर आधारित हा आहे OnePlus चा नवीन स्मार्टफोन, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 25 हजारांपर्यंत सूट!