नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटींचा महसूल मिळणार आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ संपूर्ण देशात 5जीचं जाळे पसरवणार तर व्होडाफोन-आयडियाकडून काही मोजक्या सर्कलमध्ये लिलावास पसंती मिळाली आहे. वर्षाअखेरपर्यंत देशभरात 5जी सेवेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे 5जी ची चर्चा आहे. या सर्व्हिसचा वापर करण्यासाठी तुमचा फोन 5G ला सपोर्टे करणारा हवाय. अशात कोणत्या स्मार्टफोनमध्ये 5जी सपोर्ट करतेय? 5जी साठी नवीन फोन घ्यावा लागणार का? यासारखे प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. 


खाली काही माहिती दिली आहे, त्यानुसार तुमच्या फोनमध्ये 5जी चालतेय की नाही... याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे. पाहा तुमच्या फोनमध्ये 5जी  चालणार का? 


कोणता स्मार्टफोन करणार 5G ला सपोर्ट?
5G सपोर्टसाठी तुमच्या फोनमझ्ये कंपीटिबल प्रोसेसर असायला हवं. तुम्ही सोप्या पद्धतीने तपासू शकता. त्यासाठी सेटिंगमध्ये अथवा अबाऊट फोन या पर्यायावर जा... त्यानंतर तुम्हाला हार्डवेअर सेक्शनमध्ये जावे लागेल.  तुमच्या फोनमध्येही खाली दिलेला चिपसेट असेल तर तुमच्या फोनमध्ये 5G काम करेल. 


Qualcomm : Snapdragon 865, Snapdragon 865+, Snapdragon 870, Snapdragon 888, Snapdragon 888+, Snapdragon 8 Gen 1, Snapdragon 8+ Gen 1 Snapdragon 695, Snapdragon 765/765G, Snapdragon 750/750G, Snapdragon 768/768G, Snapdragon 778/778G/778+


MediaTek : MediaTek Dimensity सीरीजमध्ये Dimensity 700 पासून Dimensity 9000 पर्यंत. MediaTek Helio-सीरीज आणि दुसऱ्या सीरीजच्या चिपसेट्स 5G ला सपोर्ट करत नाहीत. Samsung: Exynos 9820, Exynos 9825, Exynos 990, Exynos 2100, Exynos 2200


खालील ब्रँडच्या स्मार्टफोन्समध्ये  5G नेटवर्क्स सपोर्ट करते... पाहा यादी


--Apple – iPhone 12 सीरीज, iPhone 13 सीरीज, iPhone SE 2022 


--Samsung – Galaxy S-series (S20 आणि पुढील सीरीज ), Galaxy S20 FE 5G, Galaxy S21 FE 5G, Select A-सीरीज, M-सीरीज मॉडल्स. 


--OnePlus – OnePlus 8-सीरीज, OnePlus 9 सीरीज, OnePlus 10-सीरीज, OnePlus Nord-सीरीज


--Xiaomi – Xiaomi 12-सीरीज, Xiaomi 11-सीरीज, Mi 10-सीरीज, Redmi Note 11 Pro+, Redmi Note 11T, Redmi Note 10T 


--Poco – Poco F4 5G, Poco M4 5G, Poco M4 Pro 5G 


--Oppo – Reno 8 सीरीज, Reno 7 सीरीज, Reno 6 सीरीज, Select Oppo A-सीरीज, K-सीरीज, F-सीरीज फोन्स 


--Vivo – V21, V21e, V23-series, T1-series, X60-series, X70-series, X80-series 


--iQOO – iQOO 9 series, iQOO 7-series, iQOO Z5, iQOO Z6, iQOO Z6 Pro


--Realme – Realme GT series, Realme GT 2 series, Realme X7, Realme X7 Max, Realme X7 Pro, Realme Narzo 50 5G, Realme Narzo 30 5G, Realme 8/8s/8 Pro 5G, Realme 9/ 9 Pro 5G