नाशिक : नाशिकमधील अनेक उद्योजक, डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअॅप हॅक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन तक्रारींवरुन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अनोळखी नंबरवरुन ओटीपी नंबर मागितल्यास देऊ नये. शिवाय, आपापले व्हॉट्सअॅप अकाऊंट Two Step Verification करुन सुरक्षित करावे आणि तरीही व्हॉट्सअॅप अकाऊंटसंदर्भात काही शंका असल्यास सायबर पोलिस स्टेशनकडे संपर्क साधाव, असं आवाहन पोलिसांनी नाशिककरांना केलं आहे.

व्हॉट्सअॅप हॅक होण्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे आतापर्यंत जवळपास 20 तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व तक्रारी उद्योग, वैद्यकीय आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केल्या आहेत.

दरम्यान, दोन तक्रारींवरुन नाशिकच्या सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.