नवी दिल्ली/ लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात ट्विटरसह विविध सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह युजर्सची संख्या लक्षणीय आहे. त्यातच स्मार्टफोनमुळे यात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह यूजर्सकडून विविध कार्यक्रम, समारंभ आदी कार्यक्रमांचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतात.
शिवाय काही समाजकंटक अशांतता पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आलं आहे. अशा समाजकंटकांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. 2011 साली लंडनमध्ये भडकलेल्या दंगलीचं विश्लेषण करताना, याबाबची माहिती समोर आली आहे.
ब्रिटेन की कार्डिफ विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अध्ययन केलं असून, या संशोधनानुसार, मशिन लर्निंग गणना प्रणालीचा आधार घेऊन, कॉम्प्यूटर स्वत: सर्व ट्वीट आणि आक्षेपार्ह मजकुराची छाननी करु शकतं. यातून भविष्यात एखादी गंभीर घटना घडणार असल्यास, त्याची कुणकुण पोलिसांऐवजी कॉम्प्यूटरला आधी लागू शकते.
विशेष म्हणजे, समाजकंटकांकडून कोणत्या ठिकाणी दंगली भडकवण्यात येतील, आणि त्यासंदर्भात सध्या कुठे अफवाह परसवण्यात येत आहेत. शिवाय दंगलीसाठी कुठे लोकांना एकत्रित करण्यात येत आहे, याबाबतची माहिती मिळू शकते.
दरम्यान, काही घटनांमध्ये तर गुप्तहेर यंत्रणांपेक्षा ट्वीटर फास्ट असल्याचं या अहवालात म्हणलं आहे. कारण अशा घटनांची कुणकुण सुरक्षा यंत्रणांना लागण्यापूर्वी काही तास आधी कॅम्प्यूटर प्रणालीला त्याची माहिती मिळते.
ट्वीटरसंदर्भातील संशोधनाचा हा अहवाल 'एसीएम ट्रांजेक्शन ऑन इंटरनेट टेक्नॉलॉजी'च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.